ग्रामस्थांची घरे वाचवण्यासाठी बाळाराम पाटिल आक्रमक

 *कळंबोली ग्रामस्थ आक्रमक ,सिडकोला परतावे लागले*


*गरजे पोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर*

*कळंबोली * कळंबोली गावात ३५ ते ४० वर्षांपूर्वी  गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांना सिडको प्रशासन अतिक्रमित ठरवून  जमीनदोस्त करण्यासाठी मंगळवारी दुपारी आले होते. यावेळी कळंबोली गावातील ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर आंदोलन सुरू केले प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे सिडकोणे अन महापालिकेने नियमित करावी अशी मागणी यावेळी कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी केली. ग्रामस्थांचा व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा सिडको प्रशासनाच्या लक्षात येताच सिडको प्रशासनाला हात हलवत परत जावे लागले. यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता .सिडकोच्या या दुटप्पी धोरणामुळे गरजेपुरती बांधलेल्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून कळंबोली सह पनवेल तालुक्यातील ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.

     सोमवारी सकाळी नऊ वाजता सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून कळंबोली गावात गरजे पुरती बांधण्यात आलेल्या घरांना अतिक्रमित करून ती जमीनदोस्त करण्यासाठी अतिक्रमण विभागाने कळंबोली गावाला घेरले.मोठा पोलीस फौज फाट्या सह जेसिपी , सिडकोचे सुरक्षारक्षक,पोकलेन व मोठ्या सुरक्षेच्या उपायोजना करून तोडक कारवाईसाठी कळंबोली गावात सिडकोचा अतिक्रमण विभाग दाखल झाला. ३५  ते  ४०  वर्षांपूर्वी गरजेपुरती बांधण्यात आलेल्या  घरांवर सिडको प्रशासन बुलडोझर फिरवणार या कल्पनेने कळंबोली ग्रामस्थ आक्रमक झाले .यावेळी मोठ्या संख्येने कळंबोली गावातील पुरुष महिला या तोडक कारवाईच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरले. यावेळी  माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सिडको प्रशासनाला धारेवर धरले . गरजे पोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न हा एकट्या कळंबोली गावाचा नसून पनवेल तालुक्यातील  ९० ते ९५ गावांशी निगडित आहे. शासनाने पूर्वीच्या घरांना अतिक्रमण म्हणून ठरू नये तर त्यांना रीतसर परवानगी देऊन ती अधिकृत करावी अशी मागणी यावेळी बाळाराम पाटील यांनी केली. यावेळी कळंबोली गावात व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने ही  कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्ताची तयारी करून ठेवली होती. मात्र कळंबोली ग्रामस्थांचा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सिडको प्रशासनाला तोडक कारवाईपासून माघार घ्यावी लागली .कळंबोली गावातील ग्रामस्थांच्या जुन्या घरांना महापालिका व सिडकोणे नियमित करण्याची मागणी यावेळी सर्वच ग्रामस्थांनी केली. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा विविध घोषणांनी परिसर ग्रामस्थांनी दणाणून सोडला.यापूर्वीही सिडकोणे कळंबोली ग्रामस्थांना वेठीस धरले होते व तोडक कारवाई करण्यासाठी सिडकोचे अतिक्रमण विभाग सरसावले होते. कळंबोली गावातील थोडं कारवाई थांबवण्याबाबत व त्याबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी  माजी आमदार बाळाराम पाटील व अन्य महाआघाडीतील घटक पक्षातील नेते मंडळी बेलापूर येथील सिडको कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करण्यास गेले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांची भेट होऊ शकली त्यामुळे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन हे सायंकाळपर्यंत ही सुरूच होते.मात्र त्यावेळीही कळंबोलीतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन सिडकोला माघारी हात हलवत परतावे लावले होते.यावेळी ही मोठे जन आंदोलनही उभारले गेले .यामध्ये गोरगरीब जनतेचे ,प्रकल्पग्रस्ताचे धडाडीचे नेते, मा.आमदार  बाळाराम पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत , शेकापचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे,पनवेल महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे,माजी नगरसेवक गोपाळ भगत , रवींद्र भगत , पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिति संचालक देवा मढवी शेकाप महिला आघाडी प्रमुख सरस्वतीताई काथारा, सूर्यकांत म्हसकर, सेनेचे कृष्णा कदम व ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित राहुन तीव्र विरोध करून सिडकोस कारवाई थांबवणेस भाग पाडले .सदर कारवाई थांबवणेस माजी आमदार  बाळाराम पाटील यांनी अथक प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांकडून बाळाराम पाटील यांचे आभार मानले  .तसेच या गंभीर प्रश्नाबाबत पुन्हा चर्चा करण्यासाठी  ५ ऑक्टोबर रोजी सिडको भवन मध्ये प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Popular posts
मा.आमदार बाळाराम पाटील ह्यांना महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड.. .
Image
कर्जत ते पनवेल होणार, नवीन 5 स्थानके *
Image
जेएनपीटी बंदराबाहेर ८५०० कंटेनर परदेशात जाण्यापासून रखडले
Image
*खारघरमधील ज्वेलर्स लुटून गोळीबार करत पळ काढणारे दरोडेखोर ताब्यात* *पनवेल/प्रतिनिधी:* नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर नं. ३५ येथे असलेल्या बी. एम. ज्वेलर्समध्ये ३ हेल्मेट परिधान केलेल्या अज्ञात चोरांनी ११ लाख ८० हजार रुपयांचा दरोडा टाकला होता. भरगर्दीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या या ३ चोरांनी ज्वेलर्स तर लुटलेच मात्र पळून जाताना आपल्याकडे असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार देखील केला होता. यानंतर परिसरात भयंकर खळबळ माजली होती. लागलीच दिनांक २९ जुलै रोजी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य समजून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरु केला. पोलीस पथकाने प्रथमतः घटनास्थळास तात्काळ भेट दिली. आरोपी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरील CCTV फुटेज मिळवले. या CCTV फुटेजची तब्बल ८ दिवस तपासणी करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक तपासाव्दारे या गुन्हयात ४ आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. लागलीच पोलिसांची विविध पथके सुरत, गुजरात उदयपुर, राजस्थान व रायगड जिल्हातील नेरळ, माथेरान या ठिकाणी आरोपींच्या मागावर रवाना झाली. अखेर पोलीस पथकाने रिझवान अलीशेख (वय २७ वर्षे) रा. सुरत, अझरुद्दीन हुसनोदीन शेख (वय २८ वर्षे) रा. सुरत, ताहा तनवीर परवेझ सिंधी (वय २१ वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान आणि राजविर रामेश्वर कुमावत (वय २० वर्षे) रा. उदयपुर, राजस्थान या आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. यावेळी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हयात वापरण्यात आलेली २ अग्निशस्त्रे, ३ जीवंत काडतुसे, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आणि चोरीस गेलेली मालमत्ता देखील नागपाडा - मुंबई येथुन हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींना १६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दिनांक २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खारघर पोलिसांनी या किचकट गुन्ह्याचा योग्य तपास लावून सर्व मुद्देमाल हस्तगत करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Image