खारघर-तळोजा येथील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
नवीन पनवेल : खारघर (तळोजा) मधील खुटुकबांधणगावासमोरील तलावात मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या एका
तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज 8 जुलै रोजी दुपारी
२ वाजेच्या दरम्यान घडली. वाराज खान (वय-१८) असे या
तरुणाचे नाव आहे. तळोजा फेस २ परिसरात राहणारा वाराज
खान शनिवारी आपल्या दोन मित्रासह खारघर सेक्टर - ३६
मधील खुटुकबांधण गावा समोरील तलावात पोहोण्यासाठी गेले
होते. सुलेमान सोबत असलेले दोन्ही मित्र यातून कोणालाही
पोहता येत नव्हते. तरीही तलावात उतरून पोहण्याचा आनंद
घेत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने वाराजचा
बुडून मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले दोन मित्र बचावले.
ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सोबत
असलेल्या मित्रांनी याबाबतची माहिती सुलेमानच्या घरच्यांना
दिली. घरच्यांनी खारघर पोलीस ठाण्यात फोन करून झालेली
घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या
मदतीने बुडालेल्या वाराज खान शोध सुरू केला.अग्निशामक
दलाकडून संध्याकाळी उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.