*पनवेल महापालिकेच्या आयुक्त पदी मंगेश चितळे*
* पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची माळ अखेर मंगेश चितळे यांच्या गळ्यात पडली आहे.गणेश देशमुख यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती.पण निर्णय होत नव्हता. तेव्हा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी काही महिने हा कार्यभार चालवला होता.पण आता मात्र मंगेश चितळे यांचे नियुक्ती आदेश शासनाकडून काढण्यात आल्याने चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.मंगेश चितळे हे सध्या कल्याण डोंबिवली येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.त्यांनी आधी पुणे बारामती सारख्या ठिकाणी देखील काम केले आहे.
मंगेश चितळे हे पनवेल नगरपरिषद असताना मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यानंतर महापालिका निर्माण झाली.ही पालिका निर्माण होताना शासनाला जो डाटा आवश्यक होता तो जमा करून देण्याचे महत्वाचे कार्य चितळे यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.त्यामुळे पनवेलच्या समस्याच काय इतिहास,भूगोल देखील त्यांना चांगलाच माहिती आहे.मितभाषी आणि प्रशासनावर पकड असलेले आयुक्त पनवेलला मिळाले.
