*मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.संजोग भिकू वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता पिंपरी येथे भव्य बाईक रॅली व जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित महिला वर्ग आणि तरुणांची संख्या ही लक्षणीय होती. महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठिशी मावळचा विकास करण्यासाठी मावळ सोबतच रायगडातील जनता ठामपणे उभे राहील असा विश्वास श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त केला.* *यावेळी शिवसेना नेते मा.पर्यटन व पर्यावरण मंत्री आमदार श्री.आदित्य ठाकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.माणिकराव ठाकरे साहेब, राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार, शिवसेना उपनेते आमदार श्री.सचिन भाऊ अहिर,मा.आमदार श्री.बाळाराम पाटील, आमदार श्री.संजय जगताप, माजी आमदार श्री.गौतम चाबुकस्वार, पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री. जे एम म्हात्रे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार श्री.बबनदादा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*