महिला सरपंचांच्या पतीवर ॲट्रॉसिटी दाखल.
आदिवासी महिलेला सुकापूर च्या सरपंच योगिता पाटील यांचे पती राजेश पाटील यांनी केली सीवीगाळ.
पनवेल,ता.11 - आदिवासी महिलेला शिवीगाळ केल्या प्रकरणी सुकापूर ग्रामपंचायतिच्या सरपंच योगिता पाटील यांचे पती राजेश पाटील आणि दीर महेश पाटील यांच्या विरोधात खान्देश्वर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण कारवाई विषयी जाब विचारला म्हणून ही शिवीगाळ करण्यात आल्याचा आदिवासी महिलेचा आरोप आहे.मिळालेल्या हकीकती नुसार तक्रार दार महिला मागील 13 वर्षा पासून सुकापूर ग्रामपंचायत हद्दीत मच्छी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.शनिवार ( ता.9)त्या नेहमी प्रमाणे व्यवसाय सुरु करण्यासाठी गेल्या असता त्यांच्या व्यवसाया ठिकाणी ठेवण्यात आलेले साहित्य कोणी तरी नेल्याचे त्यांना आढळून आले. या बाबत माहिती घेतली असता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांचे साहित्य जप्त केल्याचे त्यांना सांगण्यात आले. जप्त केलेले साहित्य परत मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय गाठले असता विक्री साठी आणण्यात आलेले मासे कोणी तरी गायब केल्याचे त्यांच्या लक्षात आले या बाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना कोणतीही माहिती देण्यात न आल्याने त्यांनी ग्रामपंचायत सरपंच योगिता पाटील यांचे घर गाठले मात्र घरात कोणी नसल्याने आणि सरपंच योगिता पाटील यांचे पाती क्रिकेट खेळण्यासाठी गेल्याचे कळल्याने तक्रार दार महिलेने क्रिकेट चे मैदान गाठत महिला सरपंचाचे पती राजेश पाटील यांना कारवाई बाबत जाब विचारला असता पाटील यांनी तक्रार दार महिलेला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याने पाटील यांच्यावर खान्देश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.महत्वाचे म्हणजे राजेश पाटील भारतीय जनता पार्टीच्या मीडिया सेल चे पदाधिकारी आहेत.