उर्मिला कोठारे व गायत्री दातार शनिवारी पनवेल मध्ये* जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे हळदीकुंकूचे आयोजन

 *उर्मिला कोठारे व गायत्री दातार शनिवारी पनवेल मध्ये*

जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे हळदीकुंकूचे आयोजन

       आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू साजरे करण्याला महत्त्व आहे. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवतो. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आमंत्रित करतो. या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरीत्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो. हळदी-कुंकूवा बरोबरच सुवासिनींना वाण म्हणून एक भेटवस्तू देखील दिली जाते.

         हीच संस्कृती जपताना जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या आयोजना खाली हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल मधील व्ही के हायस्कूलच्या पटांगणावर 10 फेब्रुवारी 2024 रोजी शनिवारी संध्याकाळी 5:00 वाजता या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या मैत्रिणींना थोडा विरंगुळा मिळवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सोबतच हसत खेळत भरघोस बक्षिसं लुटावी आणि खऱ्या अर्थी त्यांची ओळख आनंदाच्या ह्या हळदी कुंकू कार्यक्रमात निर्माण व्हावी यासाठी आपल्यामध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे व गायत्री दातार या येणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला नक्की यायचं हे आग्रहाचे निमंत्रण सौ.ममताताई प्रितम म्हात्रे यांनी दिले आहे.                                                                 कोट                                                              आपल्याकडे पनवेलची ओळख एक ऐतिहासिक भूमी म्हणून आहे.आपली संस्कृती आणि कलेचा वारसा आपण नेहमीच जोपासला पाहिजे या उद्देशाने जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.पनवेल सोबतच ग्रामीण भागातील महिलांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. 

श्री.प्रितम जे. म्हात्रे 

(अध्यक्ष:-जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था)