खारघर मध्ये कै.अशोक(बापू) मोरे यांची शोक सभा संपन्न.

 खारघर मध्ये कै.अशोक(बापू) मोरे यांची शोक सभा संपन्न.

 पनवेल /प्रतिनिधी


     शेतकरी कामगार पक्षाचे खारघर सरचिटणीस कै. अशोक(बापू ) नारायण मोरे यांचे 17 फेब्रुवारी 2024 रोजी हृदयविकाराने  निधन झाले होते. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता उत्कर्ष हॉल  खारघर या ठिकाणी त्यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच त्यांचे सातवे  आणि बारावे दिनांक 28फेब्रुवारी 2024 रोजी  एकाच दिवशी त्यांच्या घरी करण्यात येणार आहे. यावेळी आपल्या शोकयुक्त भाषणात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले बापूंची आठवण म्हणून खारघर पक्ष कार्यालयामध्ये लवकरच रुग्णवाहिकेची सोय तसेच खारघर मधील दोन पी एच सी सेंटर मध्ये ऑटोमॅटिक ईसीजी मशीन लावण्यात येतील.

      यावेळी पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम मात्रे यांनी सांगितले बापूंच्या जाण्याने खारघर शेकाप चे नुकसान झाले आहे. बापू प्रत्येक कार्यक्रमात घोषणा देऊन कार्यकर्त्यांची मरगळ दूर करत असत. या शोक सभेला पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश कडू, प्रकाश म्हात्रे, खारघर फोरमच्या अध्यक्षा सौ. लीना गरड, महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष  मधुकर पाटील,देवा मडवी,जयेश कांबळे, अजित अडसुळे, प्रतिक ढोबले, अशोक गिरमकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खारघर मधील नरेश  पाटील सरांनी केले, याप्रसंगी अशोक मोरे यांच्या कुटुंबीयातर्फे त्यांचा मुलगा अभय मोरे आणि परिवार उपस्थित होता. तसेच खारघर मधील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.