गोव्याचे मुख्यमंत्र्यांनी केले लेखक संदीप मुळीक याचे कौतुक
मुळीक यांनी लिहलेले "गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर' या पुस्तकाचे जानेवारीत झाले होते प्रकाशन
पनवेल, ता.2 - लेखक संदीप मुळीक यांनी लिहलेल्या "गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर"या गोवा राज्यातील गड किल्यांची माहिती असलेल्या पुस्तकाचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी कौतुक केले असून,तशा स्वरूपाचे पत्र देखील मुख्यमंत्री सावंत यांनी लेखकांना पाठवले आहे.गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक, दुर्गतज्ञ, व्याख्याते प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात झाले. गोव्यातील किल्ल्यांची परिपूर्ण माहिती देणारे मराठीतील हे पहिले रंगीत पुस्तक आहे.या पुस्तकातील माहिती ,सामान्य पर्यटक, हौशी दुर्गप्रेमी आणि गडकिल्ले अभ्यासक यांच्या मनामध्ये ‘ *गोवा म्हणजे किल्ले’* हे नवीन समीकरण रुजविणारे आणि खास गडकिल्ले बघण्यासाठी गोव्याला जाण्यास भाग पाडणारे असल्याचे मत वाचकांनी व्यक्त केले.प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांनी वॉटरकलर मध्ये काढलेल्या पेंटिंगचे मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची यथार्थ प्रस्तावना.सापेक्षी दुर्गतज्ञ भागवत चिले यांची केली आहे.
*पुस्तकाची वैशिष्ट्ये :*
◾ तेरेखोलपासून ते अंजदिवपर्यंत पसरलेल्या सर्व गोमंतकीय दुर्गांची सर्वसमावेशक माहिती.
◾ प्रत्येक किल्ल्याच्या अंतरंगात डोकावणारी तब्बल 300 पेक्षा जास्त सुदंर छायाचित्रे, देखणी रेखाचित्रे आणि माहितीपूर्ण नकाशे.
◾ गोव्यातील सर्व किल्ल्यांची स्थिति स्वरूप सूची
◾ गडकिल्ले या विषयावरील पुस्तकात पहिल्यांदा QR Code चा वापर.
◾ मोठी साईझ (9.6 × 7.3 इंच) , २१६ पाने, आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत प्रिंटिंग
◾ प्रसिद्ध चित्रकार श्री. संजय शेलार यांनी वॉटरकलर मध्ये काढलेल्या पेंटिंगचे मुखपृष्ठ.
◾ सापेक्षी दुर्गतज्ञ श्री. भगवान चिले यांची यथार्थ प्रस्तावना.