कोकण रेल्वेवर बुधवारी (दि.21) तीन तासांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रत्नागिरी ते वैभववाडी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे.
यामुळे दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस रोहा ते रत्नागिरी दरम्यान 2.30 तास रोखून ठेवली जाणार आहे. इतर गाड्या देखील थांबवल्या जातील. यात कोकण कन्या एक्सप्रेस , मांडवी एक्स्प्रेस याही गाड्या थांबवल्या जातील.