Success Story : टाटांच्या गाड्यांमध्ये मराठमोळ्या इंजिनिअरचा पार्ट असणार, कोट्यवधी रुपये मोजत पेटंटची खरेदी

 Success Story : टाटांच्या गाड्यांमध्ये मराठमोळ्या इंजिनिअरचा पार्ट असणार, कोट्यवधी रुपये मोजत पेटंटची खरेदी   


    राहुल बुऱ्हाणपुरे त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. हा पार्ट इंडियन स्टॅंडर्ड नॉर्म्स नुसार बनवला असून याविषयीची माहिती त्यांनी पोर्टलवर प्रसिद्ध केली होती.

 सोलापूरच्या संशोधकाची कमाल प्रदूषण कमी करणारा पार्ट विकसित टाटा कंपनीकडून १३ कोटींना खरेदी             सोलापूर : युवा संशोधक आणि इंजिनिअर राहुल बुऱ्हाणपुरे यांनी सोलापूरचा लौकिक वाढवला आहे. राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खासगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्याना कल्पना सुचली. यावर त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला.त्यांच्या या पार्टमुळे गाड्यामधील होणारे प्रदूषण आता कमी होणार आहे. चार चाकी वाहन क्षेत्रात त्यानं केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल बुऱ्हाणपुरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी याबाबत सविस्तर माहिती दिली.