NCP New Chief : शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला
शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला समितीचा हा निर्णय पवारांना सांगण्यात येणार आहे. पवार हे आता आपल्या घराकडून कार्यालयाकडे निघाले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रस्ताव मांडला होता.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सध्या बैठक सुरु आहे. सोळा सदस्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु आहे. कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या नावानं घोषणा देत आहे. एका कार्यकर्त्याचा यावेळी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.