महाराष्ट्र दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

 महाराष्ट्र दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन 

पनवेल 

दिनांक १ मे रोजी  शेतकरी कामगार पक्ष कार्यालय पनवेल येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पनवेल मधील नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. पनवेल मा . विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ह्यांनी स्वतः रक्तदान करुन सहभाग घेतला 

यावेळी मा.आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब, मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब, नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.नारायणशेठ घरत साहेब, देवेंद्र मंढवी,देवा पाटील,मा.सभापती मा.श्री.काशीनाथ पाटील साहेब,   मा.विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे, पनवेल जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू, तालुका चिटणीस श्री.राजेश केणी, शेकाप जेष्ठ नेत्या श्रीमती माधुरी गोसावी,  मा.नगरसेवक श्री.गोपाळ भगत, मा.नगरसेवक श्री.विष्णू जोशी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.