तीन महिन्यात राज्यातून ३५९४ तरुणी बेपत्ता
मुंबई : गेल्या तीन महिन्यात १६ ते २५ वयोगटा-तील ३,५९४ तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. या महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करून शोध मोहिम राबवावी आणि दर १५ दिवसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, अशी सुचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मुली व महिला मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत असून यात१६ ते ३५ वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्र पोलीस, गृह विभाग या बेपत्ता महिलांच्या तपासासाठी करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी सोमवारी राज्य महिला आयोग कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्या अॅड गौरी छाब्रिया,सुप्रदा फातपेंकर, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे,कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक सुहास वारके, पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी, गृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णी, महिला आयोगाच्या उपसचिव दीपा ठाकूर, विधीतज्ञ अॅड वीरेंद्र नेवे उपस्थित होते.या बैठकीत राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिला,त्यांच्या तपासासाठी पोलीस तसेच गृह विभाग करत असलेली कार्यवाही, पोलिसांना बेपत्ता महिलांच्या तपासकार्यात येणारे अडथळे याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यानंतर रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, "राज्यातून महिला व मुली बेपत्ता होणे ही चिंतेची बाब आहे. आयोग५ जानेवारी २०२२ पासून विविध यंत्रणांद्वारे संपर्क करुन याबाबत पाठपुरावा करत आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महिला आयोग, महिला व बाल विकास विभाग, गृह विभागाला याबाबतची माहिती आयोगाने दिली आहे. राज्यातील मिसिंग सेल,अनेक जिल्ह्यातील भरोसा सेल हे केवळ कागदा-व
रच आहेत ही वस्तुस्थिती आहे.