भाजप आमदारांनी मंत्रिपदासाठी भामट्याला लाखो रुपये दिले? इडी कारवाई करणार का?

 नड्डांच्या ऑफिसमधून फोन आलाय समजून भाजप आमदारांनी मंत्रिपदासाठी भामट्याला लाखो रुपये दिले? 

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तोतयाने भाजप नेत्यांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून या व्यक्तीने सहा आमदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.यातील दोन-तीन आमदारांनी या व्यक्तीला लाखो रुपये दिल्याचे समजते. मात्र पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. मंगळवारी रात्री उशिरा नागपूर पोलिसांनी त्याला गुजरातमधील मोरबी येथून ताब्यात घेतले. नीरजसिंग राठोड असे आरोपीचे नाव आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ऑगस्ट २०२२ मध्ये झाला. यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशा स्थितीत मंत्रीपदासाठी घोडेबाजार होतो की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नीरजसिंह राठोड हा आमदारांच्या फोनवर संपर्कात होता. जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याचा दावा त्यानी केला. त्यांच्याकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष निधी म्हणून दोन कोटी रुपये द्या, असे तो बोलला काही दिवसांपूर्वी नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर यांचा फोन आला होता. ज्यामध्ये नीरज सिंह राठौर नावाच्या व्यक्तीने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करत त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. विकास कुंभारे यांनी याबाबत माहिती गोळा केली आणि नीरज सिंह राठोड नावाची कुठलीही व्यक्ती जे.पी. नड्डा यांच्या जवळची नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून नागपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. पण जन माणसान कडून प्रतिक्रिया येत आहे कि ऐवढे पैसे कुठून आले ह्याची चौकशी इडी करेल का ?