नवी मुंबई-पनवेल परिसरात खासगी प्रकल्पातील घरांना ग्राहक मिळेना
नवी मुंबईएकीकडे नवी मुंबईतील म्हाडाची घरं विकत घेण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागलेली असताना दुसरीकडे मात्र एमएमआरमधील नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील खासगी प्रकल्पांतील घरांकडे लोकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. एमएमआरमधील नवी मुंबई आणि पनवेल परिसरात खासगी प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरे ग्राहकांअभावी पडून आहेत.
क्रेडाई-एमसीएचआयने अलीकडेच केलेल्या पाहणीनुसार, महामुंबई क्षेत्रात जुन्या प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरे विक्रीविना पडून असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही वर्षात म्हणून रायगडमध्येही गृहंसकुले उभारण्यास लोकांनी पसंती मिळतेय त्यामुळे या परिसरातील पनवेल, कर्जत, पाली, खालापूर आदी भागांत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत, यामुळे मात्र, महामुंबई क्षेत्रात जुन्या प्रकल्पांतील जवळपास ३० हजार घरांना ग्राहक मिळत नसल्याची माहिती क्रेडाई-एमसीएचआयने अलीकडेच केलेल्या पाहणीनुसार समोर आली आहे. त्यामुळे ती विकण्यासाठी विकासकांची धडपड सुरू आहे.#mahada #navimumbai Navi Mumbai City