दशकानंतर सिडकोत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

 दशकानंतर सिडकोत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या 

नवी मुंबई 

सिडको महामंडळात जवळपास दशकभरानंतर शुक्रवारी तब्बल १४७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला. काही दिवसांपूर्वी सिडकोत उघडकीस आलेल्या २९ बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणानंतर या बदल्या झाल्याचे दिसून येत आहे.

विविध विभागांतील ३१ लिपिक/टंकलेखक, १६ कार्यालयीन साहाय्यक, १५ क्षेत्र अधिकारी, १३ ड्राफ्टमन, १४ सर्वेअर, १० स्टेनोग्राफर व ४८ शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या. एकाच वेळेस विमानतळ, मेट्रो व एक लाख घरे उभारणीचा प्रकल्प हाती घेतल्यामुळे सिडकोची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. याशिवाय सागरी किनारा मार्ग व नैना प्रकल्प यांच्या विकासाचे कामही सिडकोने हाती घेतले होते. त्यात करोना संकट आल्याने सिडकोची मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी झाली. अशा परिस्थितीत सिडकोचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक डॉ‌. संजय मुखर्जी यांच्यावर आली. त्यांनी सर्वप्रथम प्रकल्पांवर होणाऱ्या खर्चाचे आर्थिक नियोजन करण्याचे काम हाती घेतले. राष्ट्रीयीकृत बँकांसोबतच नामांकित खासगी बँकांकडून कर्जाच्या उपलब्धतेपासून पाणीपुरवठ्यातील सुधारणांपर्यंत सर्वच बाबींमध्ये त्यांनी केलेले बदल सिडकोच्या फायद्याचे ठरले.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मार्गावर आणण्यासोबतच प्रशासकीय कामकाजातही सुसूत्रता आणण्यासाठी डॉ. संजय मुखर्जी यांनी कंबर कसली आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचा बोगस कर्मचारी घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी कार्मिक व लेखा विभागाचे त्वरित लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला साहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तपाडिया यास निलंबित केले #cidco #office #transfernews #navimumbai Navi Mumbai City Navi Mumbai