४८ तासात गुन्ह्याची उकल करुन मारेक-यांना केले जेरबंद

 ४८ तासात गुन्ह्याची उकल करुन मारेक-यांना केले जेरबंद


पनवेल 

नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामधील शिवकर गाव, ता. पनवेल, जि. रायगड येथील राहणारा विनय विनोद पाटील वय १९वर्षे याचा अज्ञात इसमाने २९ मार्च रोजीचे पहाटे २.१० ते ४  वा. चे दरम्यान अज्ञात कारणावरुन धारधार हत्यारांनी शरीरावर अत्यंत क्रूरपणे वार करून खून केला होता. सदर घटनेच्या

अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. २१५ / २०२३, भा.द.वि.सं. कलम ३०२ अन्वये अज्ञात इसमांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता.

  सदर घटनेची माहिती प्राप्त झालेनंतर कक्ष - ३, गुन्हे शाखेकडून तात्काळ घटनास्थळी भेट देवून वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत समांतर तपास सुरु करण्यात आला होता. तरुणाच्या हत्येमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण होवून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. कक्ष ३ चे तपास पथकाने फिर्यादी व साक्षीदार, घटनास्थळ परिसरामध्ये मिळून आलेल्या संशयित वस्तू, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, गोपनिय बातमीदार यांचे सहाय्याने आरोपींची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मयताचे हत्येचे कारण तसेच आरोपींबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळून आली नाही. अमित काळे साो, पोउपआ गुन्हे, विनायक वस्त सो, सपोआ गुन्हे, कक्ष ३ चे वपोनि विश्वनाथ कोळेकर, सपोनि सागर पवार व कक्ष ३ चे तपास पथकाने फिर्यादी यांचेसह घटनास्थळी समक्ष घटनाक्रमाचा अभ्यास करून गुन्हयाचा प्रकार व आरोपींचा मागोवा घेतला.

कक्ष ३ चे तपास पथकाने वारंवार घटनास्थळ परिसर पिंजून काढून परिसरातील येण्या-जाण्याचे मार्ग व पाऊलवाटांची माहिती घेवून, स्थानिक रहिवासी यांचेकडे माहिती

घेवून तांत्रिक तपासाच्या व गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्यपुर्ण व सखोल पद्धतीने विचारपूस तंत्राचा परिपुर्ण वापर करून संशयित इसमांचा तपास सुरु होता. ३१ मार्च रोजी कक्ष-३ च्या तपास पथकाने उसर्ली गाव, ता. पनवेल, जि. रायगड येथुन तीन संशयितांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल

चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

आरोपींची नावे दिनेशकुमार भैय्यालाल सरोज रा. समर्थ इंटरप्रायझेस, उसर्ली गाव, ता. पनवेल, जि. रायगड,  वीरेंद्रकुमार रामदुलारे सरोज रा. समर्थ इंटरप्रायझेस, उसर्ली गाव, ता. पनवेल, चंद्रशेखरकुमार लालजी रा. समर्थ इंटरप्रायझेस, उसर्ली गाव, ता. पनवेल नमुद आरोपीत हे शिवकर गावामध्ये चोरी करण्यासाठी आलेले होते त्यावेळी त्यांनी काही रहिवाशांच्या घराला बाहेरून कडी लावलेली होती. त्यानंतर त्यांनी फिर्यादी व मयत यांचे घरातुन मोबाईल व इतर साहित्य चोरी करून जात असताना मयत याला

नमुद आरोपीत चोरी करून जात असल्याचे जाणवले असता त्याने उठुन आरोपींचा माग काढत असताना आरोपींनी त्याला चाकु व कु-हाडीने गंभीर दुखापती करत मुंबई पुणे

एक्सप्रेसवे ब्रिजचे खाली रोडलगत झुडपामध्ये ओढत नेवुन जिवे ठार मारून टाकले असलेबाबत प्राथमिक तपासामध्ये दिसुन आलेले आहे. नमुद आरोपीत हे घटनास्थळ परिसरातील बेकरी पदार्थ बनविणारे समर्थ एंटरप्रायजेस येथे ठेकेदारी पद्धतीने सुमारे २ ते ३ वर्षापासुन रोजंदारीवर कामाला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.

नमुद आरोपींना पुढील कार्यवाही करीता पनवेल शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाणेचे तपास पथक करीत आहे.

सदरचा गुन्हा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सहपोलीस आयुक्त, संजय मोहिते यांच्या आदेश व सुचनांप्रमाणे पोलीस उपआयुक्त, गुन्हे अमित काळे व सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा कक्ष ३ चे वपोनि विश्वनाथ कोळेकर व सपोनि सागर पवार, सपोनि ईशान खरोटे, पोउपनिरी सुशिल मोरे, सपोउपनिरी सचिन सुभे,

पोहवा / ९७४ प्रकाश मोरे, पोहवा / ८५ प्रविण बावा, पोहवा / १२५६ कृष्णा मोरे, पोहवा / ५६ अनिता पवार, पोहवा / १८०६ सुधीर पाटील, पोहवा / २०१६ महेंद्र पाटील, पोहवा / २०९१ चेतन जेजूरकर, पोहवा / २०८७ सचिन धनवटे, पोहवा / २२४१ किशोर बोरसे, पोहवा / २३८६ दिनेश जोशी, पोना / २८३६ राजेश मोरे, पोना / ६०३ तुकाराम सोनवलकर यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.