मा.आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीची पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध सत्ता ..

 मा.आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीची पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध सत्ता ..

 पनवेल - पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा बिनविरोध आल्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता आली आहे.

यापूर्वी महाविकास आघाडीच्या  ७ जागा बिनविरोध झाल्या होत्या आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या १० जागा बिनविरोध झाल्या. एका रिक्त जागेसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे.

 बिनविरोध निवडून आलेल्यामध्ये देवेंद्र मढवी, बाळकृष्ण पाटील,अशोक गायकर,मच्छिंद्रनाथ पाटील, नारायण घरत,अर्जुन गायकर, महादू पाटील ,सुभाष पाटील, सखाराम पाटील ,ललिता फडके, प्रताप हातमोडे ,रामचंद्र पाटील, देवेंद्र पाटील ,सुनील सोनावळे, सोमनाथ म्हात्रे ,दिनेश महाडिक, आतिश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे ,त्यामुळे महाविकास आघाडीची पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता आली आहे.