एपीएमसी मार्केटमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ

 एपीएमसी मार्केटमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ


नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच आंब्याची चाहूल लागते. आंबा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा आणि तोंडाला पाणी आणणारे फळ आहे. मात्र बाजारात दाखल झालेला आंबा हा केमिकल पावडरच्या साहाय्याने पिकवलेल्या आहे का नैसर्गिक रित्या पिकवलेला आहे, ह्याकडे कोणाचेच लक्ष नसते. मात्र नवी मुंबईकरानो सावधान... तुम्ही जो आंबा खाताय तो आंबा रासायनिक द्रव्याचा फवारणी स्वरूपात वापर करून पिकवलेल्या आंबा आहे. हा धक्कादायक प्रकार वाशी एपीएमसी मार्केट मधून समोर आला आहे.

फळे पिकवण्यासाठी इथेफॉन या रसायन पावडरचा पुडी रूपाने वापर करण्यास परवानगी असताना वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा पिकवण्यासाठी इथेफॉन या रासायनिक द्रव्याचा फवारणी स्वरूपात वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे झटपट आंबा पिकवण्याच्या नादात येथील व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.

हापूसचा हंगाम सुरू होताच हजारो ग्राहक आंब्याची चव चाखायला आसुसलेले असतात. याच हंगामात वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारात रोज हजारो आंब्याच्या पेट्या दाखल होत असतात. पेट्यांमध्ये आलेले आंबे लवकर पिकवण्यासाठी काही व्यापारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. कारण आंबे पिकवण्यासाठी व्यापारी थेट इथेफॉन या रासायनिक द्रव्याची फवारणी करत असल्याचे समोर आले आहे. एपीएमसीमध्ये फिरल्यावर व्यापारी सर्रासपणे या स्प्रेच्या माध्यमातून इथेफॉन फवारणी करताना आढळतात. #apmcmarket #vashi #mangoseason #mango