एपीएमसी संचालकांच्या कारणे दाखवा नोटिसीला तीन दिवसांची मुदतवाढ

 एपीएमसी संचालकांच्या कारणे दाखवा नोटिसीला तीन दिवसांची मुदतवाढ

नवी मुंबई 

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील आतापर्यंत १० संचालक तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले असून गणपूर्ती नसल्याने बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू नसल्याचा मुद्दा उपस्थित करून, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्त करण्याची प्रक्रिया पणन संचालनालयाद्वारे सुरू आहे.

१८ पैकी १० संचालक अपात्र ठरले असून उर्वरित आठ संचालक बाजार समितीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज, धोरणात्मक निर्णय पूर्णपणे बंद असल्याने पणन संचालकांनी आठ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, १८ एप्रिलपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले होते. इतर ठिकाणी बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी प्रतिनिधी संचालक यांनी वेळ वाढवून मागितली असून, पणन संचालकांनी तीन दिवसांची मुदतवाढ देऊन २१ एप्रिलपर्यंत अभिप्राय मांडण्याच्या सूचना संचालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या संचालकांच्या उत्तरानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाबाबत पणन विभाग काय निर्णय घेते याकडे बाजार घटकांचे लक्ष आहे. #APMC #navimumbai Navi Mumbai Navi Mumbai City