सर्रासपणे खाद्यपदार्थाच्या अनधिकृत गाड्या सुरू
खारघर येथील सेक्टर १६ वास्तुविहार या रोडलगत अनधिकृत पणे खाद्यपदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू असून याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याची दिसून येते. खारघरमध्ये सेक्टर १६, सेक्टर १८, सेक्टर १९ मोठ्या प्रमाणात खाद्य विक्रेत्यांचा गाड्या लागलेल्या आहेत. सर्रासपणे खाद्यपदार्थाची उघड्यावर विक्री सुरू असून पालिका प्रशासनाचा कानाडोळा असल्यामुळे येथील विक्रेत्यांची मज्जा चालू आहे. यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आह़े. दिवसागणिक खाद्यपदार्थ गाड्यांची संख्या ही वाढतच चालली असून यावर पनवेल महानगरपालिका ने कारवाई करावी. ज्याने ते कायम स्वरुपी बंद होईल, अशी कारवाई करावी असे खारघरवासियांची मागणी आहे. #PMC