पनवेल : कोकण शिक्षक मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार.बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार२८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २.०० वाजता, देवी अंबा माता मंदिर से. १३, खांदा कॉलनी येथे जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने आणि सुश्रुषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात ब्लड प्रेशर, टेम्परेचर,ई.सी.जी., ऑक्सिजन लेवल, एस पी ओ २, सी.बी.सी /क्रियाटीन इत्यादी चे मोफत तपासणी करण्यात आली.आवश्यक वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने माफक दरात हार्ट सोनोग्राफी, कार्डिओग्राफिक यांचेही तपासणी करण्यात आली.तसेच पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी ऍन्जोग्राफी शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत करण्याचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पनवेलचे आदर्श मा. नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांसोबत स्वतःही आपली आरोग्य तपासणी करून घेतली. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरीत्या राबवण्यात आले गुरुवार दिनांक 29/12/2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल एसटी डेपो जवळ या ठिकाणी अशाच प्रकारे शिबिराचे आयोजन सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले.