...अन् गाढ झोपेत असतानाच 12 वर्षीय मुलावर 'मृत्यू' कोसळला, पनवेलमधील मन हेलावणारी घटना
सुकापूरमधील नवजीवन सोसायटीचा स्लॅब मध्यरात्रीच कोसळला आणि या स्लॅबसोबतच सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरही कोसळला. कारण स्लॅब कोसळून या घटनेत एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
पनवेलमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सुकापूरमधील नवजीवन सोसायटीचा स्लॅब मध्यरात्रीच कोसळला आणि या स्लॅबसोबतच सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरही कोसळला. कारण स्लॅब कोसळून या घटनेत एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.ही घटना रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली . घरातील सगळे झोपेत असताना हा प्रकार घडला. यात दोघं जखमी झाले असून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इमारतीचा दुसरा आणि पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि एकच खळबळ उडाली. गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी त्यांना आपला 12 वर्षाचा मुलगा गमवावा लागेल.