उर्वरित ३२ कर्मचाऱ्यांचा पनवेल महानगरपालिका मध्ये समावेशन कायम

 उर्वरित ३२ कर्मचाऱ्यांचा पनवेल महानगरपालिका मध्ये समावेशन कायम     


                 पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचा पालिकेत समावेशनासाठी पालिका कर्मचाऱ्यांसह मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे ह्यांनी पनवेल महानगरपालिका ते मंत्रालयापर्यंत पायी चालत जाऊन , तत्कालीन महाविकास आघाडी सरकार मधील मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार, नगरविकास मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडे तत्कालीन रायगड जिल्हा पालक मंत्री मा.कु.आदितीताई तटकरे, आमदार भाई जयंत पाटील साहेब, आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब, यांच्यासह   तत्कालीन विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे तसेच कामगार नेते शिष्टमंडळांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समावेशन करून कायम करण्याची मागणी केली होती. ही मागणी तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी मान्य करत पुर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीच्या ३२ कर्मचारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांना कायम केले. 

      या उर्वरित ३२ कर्मचाऱ्यांच्या समावेशनासाठी कायम प्रितम म्हात्रे ह्यांनी मंत्रालयात पाठपुरावा करत राहिले . ३ नोव्हेंबर रोजी या कर्मचाऱ्यांच्या समावेशाचे अधिकृत पत्र आले आहे.  आज या 32 कर्मचाऱ्यांनी मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब व मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केला. 

     नागरिकांनाच्या आणि कामगारांच्या आम्ही सदैव पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणी दुर करत राहु.  

मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे