नैना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आमदार जयंत पाटील यांच्यासोबत बैठक

 नैना प्रकल्पग्रस्त  शेतकऱ्यांची  आमदार जयंत पाटील यांच्यासोबत बैठक

 पनवेल : 23 गावांमध्ये येऊ घातलेल्या नैना प्रकल्प विरोधात शेतकऱ्यांची एकजूट कायम होत चालली आहे. या नैनाला शेतकऱ्यांमधून कायम विरोध केला जात आहे. नैनाला विरोध करण्यासाठी या पुढे शेतकरी मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांची पनवेल येथील शेकाप कार्यालयात आमदार जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. 
  नैना हटाव, शेतकरी बचाव अशी मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. पनवेल परिसरात नैना विरोधी शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने जनजागृती केली जात आहे. सिडको रुपी नैना ही तालुक्यातील बांधकामे तोडण्यासाठी येते, त्याला नैना विरोधी शेतकरी उत्कर्ष समिती प्रखर विरोध करन त्यांना माघारी पाठवत आहे. 28 सप्टेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल येथील कार्यालयात शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. व पुढील मोहीम ठरवण्यात आली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी नैनाविरोधातली आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांनी व सर्व गावांनी एकत्र येणे गरजेचे असून नैनाला विरोध करायचा आहे. आमच्या जमिनी आम्ही विकसित करू असा पवित्रा शेतकर्यानी घेतलेला आहे.