महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विज्ञान-तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाच्या पनवेल शहर जिल्हा "अध्यक्ष" पदी मुसादिफ मोडक
पनवेल, ता.29 - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विज्ञान-तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाच्या पनवेल शहर जिल्हा "अध्यक्ष" पदी मुसादिफ मोडक यांची नियुक्ती करण्यात आल्याने मोडक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मोडक यांच्या नियुक्तीमुळेविज्ञान-तंत्रज्ञान व कौशल्य विकास या सारख्या महत्वाच्या विभागाला न्याय मिळेल अशी अपेक्षा केली जात असून,स्व राजीव गांधी यांच्या विचारातील विज्ञान - तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाचे उपक्रम तसेच पक्ष संघटन, काँग्रेस पक्षाला जनाधार प्राप्त होईल असे कार्य मोडक यांच्याकडून करण्यात येईल अशी अपेक्षा पनवेल शहर कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॉग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या जवाबदारी बद्दल बोलताना मोडक यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विज्ञान-तंत्रज्ञान व कौशल्य विकास प्रदेश अध्यक्ष सुरेश यादव आणि शहर कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे आभार मानले आहेत.शुभेच्छुक देताना :- • अभिजीत दादा पाटील - अध्यक्ष : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस,• डॉ स्वप्नील पवार - उपाध्यक्ष : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस,• शशिकला सिंह - कार्यध्यक्ष : पनवेल शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस• अभिजीत मुंडक्कल - उपाध्यक्ष : पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस,• सायरा अहमद - उपाध्यक्ष : पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेस,• हरप्रित कौर बैनस - अध्यक्ष : खारघर शहर महिला काँग्रेस व आदि काँग्रेस नेते उपस्थित होते..