खारघर मधील कचरा संकलन केंद्र हलवण्याचं आश्वासन
कचरा संकलन केंद्र हलवा या मागणीसाठी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांची सहाय्यक आयुक्ताशी भेटपनवेल, ता.24 - खारघर वसाहतीत विविध भागात असलेले कचरा संकलन केंद्र इतर ठिकाणी हलवण्यात यावेत या मागणीसाठी खारघरमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार ( ता.23) पालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन पवार यांची भेट घेतली आहे. या वेळी झालेल्या चर्चेत वसाहतीत असलेले कचरा संकलन केंद्र इतर ठिकाणी हलवण्यात येथील असे आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी दिल्याची माहिती खारघर शहर कॉग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मुसादीफ मोडक यांनी दिली. खारघर वसाहतीमधील सेक्टर 27,30 आणि 35 मध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत कचरा संकलित करण्यासाठी संकलन केंद्र सुरु असून वसाहती अंतर्गत असणाऱ्या या संकलन केंद्रातील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून रोगराई पसरण्याची भीती असल्याने वसाहती मधील ही केंद्र बंद करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे.शुक्रवारी घेण्यात आलेल्या भेटी प्रसंगी पनवेल शहर कॉग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील रवींद्र पवार, उपाध्यक्ष रेमंड गोवेस,
उपाध्यक्ष अभिजित ज्योतिंद्रान मुंडक्कल, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील रवींद्र पवार उपस्थित होते.