शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेकापचे रास्ता रोको आंदोलन.
गंगामसला- माजलगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे.
माजलगाव-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर मोठेवाडी फाटा (छोटेवाडी) येथे दि.३ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन केले.
माजलगाव शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई अॅड.नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वाखाली पावसा अभावी शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या, पिक विमा लागू करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, रासायनिक खताच्या किमतीत केलेली भरमसाठ भाव वाढ रद्द करा, साठ वर्षावरील शेतकऱ्यांना प्रतिमहा दहा हजार रुपये पेन्शन द्या, पिक कर्ज वाटपात चाललेली बँकेच्या अधिका-याची मनमानी थांबवा, या मागण्यासाठी तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी वाहतूक प्रचंड ठप्प होऊन वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या,या आंदोलनात भाई अॅड नारायण गोले पाटील,भाई मुंजा पांचाळ, भाई गणेश कदम,भाई विष्णू शेळके, संभाजी चव्हाण, राजाभाऊ घोडके, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अॅड पांडुरंग गोंडे, कॉम्रेड सुदर्शन हिवरकर, अनंतराव शिंदे, राहुल सोळंके,निवृत्त मंडळाधिकारी पद्माकर मुळाटे, रंजीत जाधव, राहुल सुरवसे, व्यंकटी खुळे, राधाकृष्ण इंगळे, विद्यासागर करपे, गणेश यादव, भरत किनोळकर, विलास जाधव, बाळू आठवे, राजेभाऊ शेरकर, नितिन डांगे,लक्ष्मण खाडे यांच्यासह छोटीवाडी, मोठेवाडी, गंगामसला, रामनगर,आबेगाव,छत्रबोरगाव पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक एन.आर.इंधाटे व सहकारी यांनी प्रचंड बंदोबस्त लावला होता तर तहसील कार्यालय माजलगाव यांच्या वतीने मंडळ अधिकारी ए.डबल्यू. सानप यांनी आंदोलकांच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले.