शेकापने फोडली मालमत्ता कराची हंडी
मनपाच्या अन्यायी लुटीची बेडी तोडू, चला मालमत्ता कराची हंडी सही करून फोडूया घोषणेसह शेकापतर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कराची दहीहंडी फोडण्यात आली.खांदा कॉलनी, कळंबोली इत्यादी परिसरात मनपा, सिडको यांच्या दुहेरी मालमत्ता कराची प्रीतम म्हात्रे यांचा पुढाकार दहीहंडी सही करून फोडली आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आ. बाळाराम पाटील,माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा चिटणीस गणेश कडू,सहचिटणीस प्रभाकर कांबळे, महादेव वाघमारे, गणेश पाटील, सारिका भगत, श्री. अनिल बंडगर (शहर अध्यक्ष),श्री. किरण घरत, योगेश कोठेकर,सागर भडांगे, संतोष सावंत, श्याम लागडे, रोहन वटकर,भगत, किशोरी पाटील, नलिनी अतुल जाधव, निर्मला गुंडर, अश्विनीजोगदंड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकापने फोडली मालमत्ता कराची हंडी
• Ajit Adsule
