इमारती वरुन पडून मजुराच्या मुलाचा मृत्यू

 इमारती वरुन पडून मजुराच्या मुलाचा मृत्यू

पनवेल, ता.29 ( प्रतिनिधी ) खांदा वसाहती मधील सेक्टर 17 येथील बांधकाम सुरु असलेल्या ऐका इमारती वरून पडून एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ( ता.28) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली आहे.गोलू राम पाल यादव असे या सात वर्षीय मुलाचे नाव असून बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी आपल्या वडिलांसोबत खेळत असताना दहाव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने तो जखमी झाला होता. जखमी झालेल्या गोलू यांना नजदिकच्या एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आल्या नंतर तपासा अंती रुग्नालयातील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे.या घटनेची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास कामोठे पोलिस करणार आहेत.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बुधवारी ( ता.29)  घटना स्थळी पोहचलेल्या कामगार विभागाच्या सह आयुक्त शीतल कुळकर्णी यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. या वेळी इमारती चे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाय योजना विकसकाने राबवल्याचे लक्षात आल्याने इमारतीत काम करणाऱ्या बांधकाम मजु्रांसाठी सुरक्षा उपाय राबवल्या शिवाय इमारती चे बांधकाम बंद ठेवण्याच्या सूचना संबंधित वीकसकाला दिल्या आहेत.