आर.पी.आय. च्या गणेश पाटेकर सह शेकडो जणांचा शेकाप मध्ये प्रवेश.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस पनवेल महानगर पालिका देवेंद्र मढवी आणि कल्पेश तोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर. पी. आय. चे गणेश पाटेकर यांच्या समवेत शेकडो आर पी आय च्या कार्यकर्त्यांनी काल दि 10जून 2022 रोजी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला, या सर्वांचे शेतकरी कामगार पक्षात कोकण शिक्षक मतदार संघाचे आम. बाळाराम पाटील यांनी स्वागत केले.या वेळी आम. बाळाराम पाटील यांनी सांगितले आपल्या सर्वांना शेकाप मध्ये सन्मानाची वागवणूक मिळेल. तसेच कोणतेही खोटे आश्वासन दिले जाणार नाही. गेली दहाबारा वर्षे या ठिकाणी पैशाचे अमिश आणि खोटे अश्वासन देऊन आपली पोळी भाजली जात आहे.असा टोला भाजपला लावला, ते पुढे म्हणाले खारघर मध्ये फक्त शेतकरी कामगार पक्षानेच विकासाची कामे केली आहेत. आजचे पक्ष प्रवेश कणारे कार्यकर्ते हे धगधगते निखारे आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मोरे यांनी केले.या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस पनवेल महानगर पालिका देवेंद्र मढवी, कल्पेश तोडेकर,मदन पवार, नरेश पाटील, दिलीप ठाकूर, अशोक म्हात्रे, संतोष तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.