पनवेल : पनवेल मध्ये प्रथमच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून एका छत्राखाली व्यवसाय आणि अर्थसहाय्य शिबिराचे आयोजन ज्यात केंद्र सरकारचे विविध कोर्सेस ची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यक ते परवाने काढण्यासाठी नियोजन असल्याने कोर्स पूर्ण करून परवाने काढल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मार्फत ज्या विविध सबसिडी कर्जही मिळतील. ते मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध नॅशनलाईज बँकांचे प्रतिनिधी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. हे शिबिर युवक, महिला आणि तृतीय पंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आले होते.
प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून एका छत्राखाली व्यवसाय आणि अर्थसहाय्य शिबिराचे आयोजन