पनवेल येथे काही दिवसापासून पनवेल एसटी डेपो समोरील पनवेल महानगरपालिकेची सोनबा येलवे पाणपोई बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना सद्याच्या वाढत्या तापमानामुळे नाईलाजास्तव पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे भेट देऊन संबंधित विभागातील अधिकारी श्री.अविनाश पाटील यांना बोलावून घेऊन पाणपोईची पाहणी केली.
पाणपोईचे तुटलेले नळ त्वरित बदलण्यास सांगितले, पाणी साठवण करण्यासाठी स्टोरेज टँक नसल्यामुळे नळाला सतत पाणी येत नसल्याने ताबडतोब स्टोरेज टाकी बसविण्याच्या सूचना केल्या. तसेच या ठिकाणी अस्वच्छता ही दिसत आहे ती त्वरित स्वच्छ करण्यास सांगितली, सदर पाणपोई स्वच्छ करून तेथील ड्रेनेजचे पाणी निचरा होण्यासाठीची पाईपलाईन सुद्धा बदलण्यासाठी सक्त आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
प्रितम म्हात्रे ह्यांनी पनवेल येथील पाणपोई ची पाहणी करुन चालु करण्याचे दिले आदेश