प्रीतम म्हात्रेंना 'नवी मुंबई रत्न' पुरस्कार

 प्रीतम म्हात्रेंना 'नवी मुंबई रत्न' पुरस्कार 

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याबद्दल पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई आणि क्रेडाई एमसीएचआय युथ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई रत्न पुरस्कार देऊन गौरविले.क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्या वतीने कोव्हिड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल नवी मुंबईरत्न पुरस्कार २०२२ चेवितरण वाशी येथील विष्णुदासभावे नाट्यगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्या वतीने कोव्हिड काळात महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबाबत सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.