महाविकास आघाडीचा, महामोर्चा

महागाई वाढली ....पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा महागाईविरुद्ध धडक मोर्चा 

महागाई वाढली ....पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा महागाईविरुद्ध धडक मोर्च

पनवेल  - वाढत्या महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीतर्फे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविकासआघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

     १३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता पनवेल प्रांत कार्यालयावर हा धडक मोर्चा धडकणार आहे .पेट्रोल आणि डिझेलचे गगनाला भाव भिडले, गॅस भाजीपालाने रडवले... या वाढत्या महागाईच्या विरोधात हा महाविकास आघाडीचा एल्गार ... आक्रमक मोर्चा निघणार आहे .
       या पत्रकार परिषदेला आमदार बाळाराम पाटील,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, माजी आमदार मनोहर भोईर,महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील, काँग्रेसचे आर सी घरत,शिवसेनेचे शिरीष घरत तसेच रामदास शेवाळे, काशिनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते.   पेट्रोल - डिझेल,घरगुती गॅस यांचे रोजचे वाढते आकडे, महाराष्ट्रद्रोही केंद्र सरकारचा तपास यंत्रणांचा  गैरवापर , महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, बँक घोटाळा , विक्रांत घोटाळा या सर्वांच्या विरुद्ध सामान्य नागरिकांच्या भावनेला आणि आक्रोशाला वाट करून देणारा हा धडक मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
         केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकासआघाडी उभी असून या सर्व समस्यांमधून सामान्य माणसाला त्वरित दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा जाहीर आणि तीव्र निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे पनवेलमध्ये भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.      
 
           त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेने पूर्वलक्षी लादलेल्या मालमत्ता कराचा निषेध व नागरी समस्या सोडवण्यात महापालिकेला आलेले अपयश याचाही निषेध यावेळी करण्यात येणार आहे.