डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीचे अवचित्य साधुन शेकाप तर्फे वाचनालयाचे उदघाटन.
पनवेल,ता.14 - शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीला अनुसरून खारघर येथील शेकापक्ष पदाधिकारी कल्पेश तोडेकर आणि सहकारी यांनी गुरुवारी ( ता.14 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे अवचित्य साधून खारघर वसाहतीत सेक्टर 11 परिसरातील चौकात सार्वजनिक वाचनालय सुरु केले आहे. तोडेकर यांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरु केलेल्या या वाचनालयाचे उदघाटन शिक्षक आमदार बाळाराम पाटील, माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील,पालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे,देवा मढवी, जगदीश घरत तसेच परिसरातील शेकाप कार्यकर्ते आणि भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भीम जयंतीचे अवचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्क्रमात बाबासाहेबाच्या प्रतिमेचे पूजन करून मानवदंना देण्यात आल