नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
तारीख १४/०३/२०२२ नवी मुंबई महानगरपालिकेतील साडेसात हजार चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यांच्या मागण्या पुर्ण होईपर्यत हे आंदोलन चालू ठेवणार असल्याचे माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ नवी मुंबई येथील "समाज समता कामगार संघाचे"युनिट अध्यक्ष मोहन शेलार यांनी,"जनसभा"च्या प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले.यावेळी संतोष भोर,आविन पाटील महिला पदाधिकारी सौ.पूनम गवारे,आशा पाखरे,पुनम पाडमुखे यांनी आंदोलनाची दीशा स्पष्ट केली. संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन भोईर आणि सरचिटणीस मंगेश लाड हे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
साडेसात हजार कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना असल्या तरी मागण्यांच्या बाबतीत सर्व संघटनांचे एकमत आहे.संघटनेचे पदाधिकारी मोहन शेलार हे "जनसभा"च्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की,आम्ही एस.टी.कामगारांचा आणि गिरणी कामगारांचा संप अनुभवला आहे.आम्हांला कोणत्याही पक्षापेक्षा आमची जबाबदारी महत्त्वाची आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या,आम्ही आंदोलन मागे घेऊ.