नो सर्विस..! नो टॅक्स..! पनवेल महानगरपालिकाचा जुलमी कर

 नो सर्विस..! नो टॅक्स..! 

आज पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी मालमत्ता करविरोधात  नवी मुंबई ९५ गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीने हिरानंदानी खारघर ते पनवेल महानगरपालिका मुख्यालय पर्यंत काढलेल्या लॉंग मार्च मध्ये पनवेल-उरण महाविकास आघाडीचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते. 

नवी मुंबई ९५ गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या शिष्टमंडळासह पालिका मुख्यालयात आयुक्त मा.गणेश देशमुख साहेबांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब, पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष मा.श्री.बबनदादा पाटील साहेब, पनवेल नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष मा.श्री.जे.एम.म्हात्रे साहेब, पनवेल पंचायत समितीचे मा.सभापती मा.श्री.काशिनाथ पाटील साहेब, नवी मुंबई ९५ गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुरेश ठाकूर, मी स्वतः विरोधी पक्ष नेता प्रितम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री.सुदाम पाटील, नवी मुंबई ९५ गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीचे श्री.रविंद्र भगत, श्री.सुधाकर पाटील, श्री.रमाकांत पाटील, श्री.संतोष पवार, श्री.मदन गोवारी, श्री. विजय गडगे, नगरसेवक श्री.अरविंद म्हात्रे, श्री.विष्णू जोशी, श्री.सखाराम पाटील, मा.नगरसेवक श्री.शंकर म्हात्रे, कामगार नेते श्री.प्रकाश म्हात्रे तसेच इतर मान्यवर महिला मंडळ व रहिवासी यावेळी उपस्थित होते.