देवळोली गावचे सुपुत्र देविदास पाटील यांना "रायगड भूषण" पुरस्कार

 देवळोली गावचे सुपुत्र देविदास पाटील यांना "रायगड भूषण" पुरस्कार


अलिबाग येथील पी एन पी नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात दिला जाणार पुरस्कार


पनवेल, ता.4 - रसायनी येथील देवळोली गावाचे सुपुत्र देविदास पतीला यांना सन 2021 - 22 या वर्षाचा "रायगड भूषण"पुरस्कार जाहिर झाला आहे.जिल्हयातील क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, धार्मिक, सांस्कृतिक, अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येत असतो. अलिबाग येथील पी एन पी नाट्यगृहात रविवारी ( ता.6) आयोजित करण्यात आलेल्या समारोहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, देविदास पतील यांना हा पुरस्कार जाहिर झाल्याने शेकाप चे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी देविदास पाटील यांचे कौतुक करत सत्कार केला आहे. पॅरा खेळाडू असलेले देविदास पाटील वॉटर स्पोर्ट्स ( कायाकिंग कॅनोई -रोईंग ) खेळा मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असून ते पोलिओ ग्रस्त आहेत.डाव्या पायाने पोलिओ ग्रस्त असूनही लहानपणापासून  हार न मानता जीवनाशी संघर्ष करता करता खेळा कडे वाट चाल करत देविदास यांनी आता पर्यंत 3 आंतर राष्ट्रीय व 5नॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केल आहे.

 चीन येथे होणार असलेले आगामी आशियन         गॅम्स 2022 लक्ष असल्याची माहिती देविदास यांनी दिली असून, देविदास यांना आता पर्यत जिल्हा क्रीडा पुरस्कार 'गुणवंत दिव्यांग खेळाडू 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे 2022 साली अभिमान महाराष्ट्र चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार देण्यात आला आहे.तसेच पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे ह्यांनी सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.