भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे सिडकोने पुष्पक नोड उलवे येथे साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत वाटप केलेल्या ३५,७८० चौमी क्षेत्रफळाच्या भूखंडावर आता गंडांतर आले आहे. भूखंडाचे वाटप करताना सिडको व्यवस्थापनाकडून अनियमितता झाल्याचे नगरविकास विभागास आढळून आले आहे. त्यामुळे वर्षा प्रशांत ठाकूर व कृष्णा चांगु ठाकूर यांना साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत पुष्पक नोड सेक्टर २६ उलवे येथे वाटप करण्यात आलेला भूखंड रद्द करण्याचे आदेश नगरविकास विभागाने शुक्रवारी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. नगर विकास विभागाच्या या आदेशाची प्रत सिडकोस प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल,असे सिडको सूत्रांनी सांगितले.भूखंड वाटप करताना ठाकूर हे सिडको महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वाटप रद्द करण्यात येणाऱ्या या भूखंडाचे बाजारमूल्य ३०० कोटींहून अधिक असल्याची चर्चा आहे.सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीफडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत झालेले गैरव्यवहार उघडकीस आणण्याचे आदेश मंत्र्यांना दिले होते. त्या अनुषंगाने अधिवेशन संपण्यापूर्वीच आघाडी सरकारने ठाकूर यांना पहिला धक्का दिला आहे. सिडकोच्या अध्यक्षपदी असताना ठाकूर यांनी आपल्या पत्नीच्या नावे जासई येथे असलेली जमीन सिडकोला संपादित करण्यास सांगून त्याबदल्यात साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत उलवा परिसरात मोक्याच्या ठिकाणी तब्बल ३५७८०चौमी क्षेत्रफळाचा भूखंड वाटप करून घेतला, असे निदर्शनास आले.या भूखंड वाटपात अनेक त्रुटी वअनियमितता झाली असल्याचा आरोप सरकारला प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला होता. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने सिडकोकडूनअहवाल प्राप्त करून घेतल्यानंतरया भूखंड वाटपात अनियमितता झाले असल्याचे म्हटले आहे. साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत जमीन संपादित करणे व त्याबदल्यात भूखंड वाटप करताना सिडकोने निश्चित केलेल्या धोरणानुसार भूखंड वाटपाची कार्यपद्धती अवलंबिली नसल्याचा ठपका नगरविकास विभागाने ठेवला आहे. तसेच जासई इथल्या संपादित जमिनीपोटी पुष्पक नोड येथील सेक्टर २६ येथे भूखंड वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत न घेता व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या पातळीवर घेण्यात आला होता. याशिवाय सिडको महामंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार
संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये भूखंड वाटपाची सोडत आयोजित करून त्याचे चित्रीकरण करणे अपेक्षित होते. तसेन केल्यामुळे भूखंड वाटपात पारदर्शकता राहिलेली नाही, असा ठपका ठेवण्यातआला. त्याचबरोबर भूखंड वाटपाची सोडत व्यवस्थापकीय संचालक व सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत होऊन सुरुवातीस उलवा,सेक्टर २९ येथील भूखंड वर्षा प्रशांत ठाकूर यांना देण्यात आला होता. मात्र हा भूखंड घेण्यास भूधारकाने नकार दिल्याने कोणतेही सबळ कारण नसताना आणि निर्धारित भूखंड बदलून देताना सिडको संचालक मंडळाच्या ठराव क्रमांक१२१५९ अन्वये विहीत केलेली कोणतीही परिस्थिती उद्भवलेली नसताना, केवळ भूधारकाच्या विनंतीनुसार पुन्हा सोडत आयोजित करून भू धारकास उलवा,पुष्पक नोड येथील सेक्टर २६,भूखंड क्रमांक १ हा ३५७८० चौ. मी.क्षेत्रफळाचा भूखंड वाटप केला. भूखंड बदलून दिल्याने अर्जदाराचा अवाजवी फायदा झाल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.