दिनांक ११/०२/२०२२रोजी भारतरत्न, गानसम्राज्ञी स्व.लता(दीदी) मंगेशकर यांच्या स्मरणार्थ जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात "तुम मुझे यू भूला ना पाओगे" संगीत समारंभ आयोजित करण्यात आले होते.
जगद्विख्यात गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबत देशात-परदेशात अनेक वर्षे स्टेज शो करणारे संगीतकार अजयमदन यांचे संगीत दिग्दर्शन, लतादीदींच्या मुलाखती घेणारे प्रसिद्ध रेडिओ जॉकी गौरव यांचेआकर्षक निवेदन आणि रसिकांना भुरळ घालणाऱ्या आवाजात गायिकांनी- सादर केलेली लतादीदींची गाणी अशाभरगच्च मैफलीने पनवेलकर शुक्रवारी रात्री मंत्रमुग्ध झाले. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने पनवेलच्या फडके नाट्यगृहात लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.संस्थेचे अध्यक्ष आणि पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून झालेल्याया मैफलीत लतादीदींना त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली, सोबत संगीतकार अजयमदन यांनी लतादीदींच्याआठवणींना उजळा दिला. लतादीदींनाअनेक गाण्यांसाठी साथसंगत केलेल्या वादकांचा या कार्यक्रमात सहभाग होता. गायिका संगीता मेढेकर,मैथिली माळी आणि प्राजक्ता यांनी सादर केलेली गीते आणि आरजे गौरव यांनी सांगितलेल्या लतादीदींच्या आठवणी यांनी उपस्थितांना भुरळ घातली. लतादीदींच्या लहानपणापासून ते त्यांनी यशाचे शिखर गाठेपर्यंतचा संपूर्ण संगीतप्रवास या मैफलीतर रसिकांपुढे मांडण्यात आला. सायंकाळी ७वाजल्यापासून सुरू असलेली मैफल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लतादीदींच्या वेगवेगळ्या मुद्रा असलेले रांगोळी, नाट्यगृहात लतादीदींच्या आठवणींचे चित्र यामुळे फडके नाट्यगृह शुक्रवारी सायंकाळीलतामय झाले होते, अशा शब्दात पनवेलकरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.