पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भातान येथे श्री दत्त क्रिकेट संघाने दि.७ ते १० जानेवारी रोजी ग्रामीण नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त प्रितम म्हात्रे ह्यांनी सामन्याचे शुभारंभ केले.
यावेळी सरपंच श्री.सुभाष भोईर, उपसरपंच श्री.केशव गायकर, मा.सरपंच श्री.नंदकुमार मुकादम, मा.सरपंच श्री.चंद्रकांत भोईर, ग्रा.सदस्य श्री.दीपक ठाकूर, ग्रा.सदस्य श्री.अनिल काठावले,ग्रा.सदस्य श्री.नरेश भोईर, ग्रा.सदस्य श्री.सुनील सते, श्री.अनंता मुकादम, श्री.सुरेश भोईर, श्री.कृष्णा गाताडे, श्री.नितीन भोईर, श्री.संतोष भोईर, श्री.बाळाराम भोईर, श्री.जनार्दन घरत, अमिटी विद्यापीठाचे श्री.शरंजित सर, श्री.के.के.सिंग तसेच खेळाडू व रसिक प्रेक्षक यावेळी उपस्थित होते.
#cricket#