मुंब्रा - पनवेल महामार्गावर मृत्यचे सापाळे.
पनवेल पालिकेचे दुर्लक्ष, महामार्गावर उभारले जात आहेत विना परवानगी आवाढव्य जाहिरात फलक.
........तळोजा वन परिसरात कोसळला जाहिरात फलक
तळोजा फेस वन परिसरातील आरएएफ चौकात नुकताच एक जाहिरात फलक कोसळला आहे. या ठिकाणी कोणतीही जीवित हाणी झालेली नसली तरी पुणे महापालिका हद्दीत काही वर्षा पूर्वी जाहिरात फलक कोसळून जीवित हाणी झाल्याच्या प्रकाराची पनवेल पालिका आयुक्त वाट पाहत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
...........तळोजा पाचनंद परिसरात दोन फालकांचे काम तर रोहिंजन हद्दीत गजेंबो हॉटेल समोर ऐका फलकाचे काम सुरु असताना देखील पालिका अधिकऱ्यांची डोळ्यावर पट्टी
......पुण्याच्या घटनेची पुनरवृत्ती पुणे महापालिका हद्दीत काही दिवसा पूर्वी जाहिरात फलक कोसळून काही व्यक्तींना आपला जीव गमवाला लागला होता. पनवेल पालिका देखील अनधिकृत फालकांना परवानगी देऊन आशी घटना व्हावी अशी अपेक्षा करत आहे का? हिंजन येथे उभारण्यात येत असलेल्या फलकाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. संबंधित फलक कंपनीने परवानगी साठी अर्ज jकेला आहे. मात्र परवानगी देण्या आगोदरच कंपनीने फलक उभारण्यास सुरवात केल्याने अनधिकृत फलकावर कारवाई केली जाईल- जयराम पादीर. पालिका अधिकारी