पनवेल शेकापचा ढाण्या वाघ हरपला,पनवेलचे शेकाप नेते कादीरभाई कच्छी यांचे आकस्मित निधन...

 पनवेल शेकापचा ढाण्या वाघ हरपला,पनवेलचे शेकाप नेते कादीरभाई कच्छी यांचे आकस्मित निधन...

  लाल बावट्याचा निष्ठावंत सेवक होता तोप्राणप्रणाने लढणारा शेकापचा वाघ होता तो   सर्वांना हात देणारा दानशूर होता तो म्हणूनच तर सर्वांचा लाडका भाई होता तो...

    मागील काही दिवसांपासून शेकाप परिवारात एकामागोमाग एक लढवय्ये जात आहेत.पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळख असणारे तसेच शेकाप ज्यांच्या रक्तात होता असे कट्टर निष्ठावंत शेकाप नेते ,पनवेल विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच गोरगरीबांना अहोरात्री मदत करणारे मसिहा कादीर कच्छी यांचे आज दुपारी आकस्मित निधन झाले.त्यांचे असे अचानक निघून जाणे ही अतिशय हदयद्रावक घटना आहे.आज त्यांच्या जाण्याने पनवेल शेकाप परिवारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.अल्पसंख्यांकात शेकापचे विचार रूजविणारा पुरोगामी विचारांचा खंदा कार्यकर्ता असा अचानक हे जग सोडून जाणे म्हणजे पुरोगामी विचारांचा पाया ढासळण्यासारखे आहे.पनवेलमधील राजकारणात शेकाप नेत्यांना आपली सर्वतोपरी मदत करणारा हा मोठ्या दिलाचा राजा होता.विरोधकांनाही आस्मान दाखविणारा कादीर भाई शेकापचा खराखुरा वाघ होता.परमेश्वरा एवढा कठोर कधी पासून झालास रे अगदी निष्ठेने कार्य करणा-या सच्चा निष्ठावंतास आज घेऊन गेलास.शेकापचा कुठलाही कार्यक्रम असला की कादीरभाईंचा जातीने सहभाग असायचा,नेत्यांसाठी प्राणप्रणाने किल्ला लढणा-या शेकापच्या या निष्ठावंत सेवकास भावपूर्ण श्रद्धांजली...तसेच अखेरचा लाल सलाम.