अनधिकृत शेड मध्ये जुगाराचा अड्डा....

 अनधिकृत शेड मध्ये जुगाराचा अड्डा....


फौजी असल्याचे सांगत कळंबोली पार्कींग- ५ नंबर परिसरात चालवला जात आहे जुगाराचा अड्डा.एका अग्रगन्य दैनिकाच्या प्रतिनिधीचा देखील अड्डा चालवणाऱ्यांमध्ये सहभाग.

कळंबोली - कळंबोली लोखंड आणि पोलाद बाजार परिसरात पदपथावर जुगाराचा अड्डा चालवण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे जुगाराचा हा अड्डा चालवणारा व्यक्ती स्वतःची ओळख "फौजी"अशी करत असून, राजरोस पणे सुरु असलेल्या या अड्डया कडे स्थानिक पोलीस स्टेशनकडून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने, पोलिसांच्या भूमिकेबाबत देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे.महत्वाचे म्हणजे हा अड्डा चालवणाऱ्यांमध्ये राज्यातील एका अग्रगण्य दैनिकाच्या प्रतिनिधीचा देखील समावेश असल्याने आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही या तोऱ्यात येथील अड्डा चालवणारे वावरत आहेत.लोखंड आणि पोलाद बाजार परिसरातील पार्कींग ५ नंबर या भागात अवजड वाहने उभी करण्यासाठी ट्रक टर्मिनल आहे. या ठिकाणी देशभरातून अवजड वाहने ये-जा करत असतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या भागात चालणाऱ्या अवैध धंद्यावर स्थानिक पोलीस प्रशासनाणे मागील काही वर्षात कारवाई केल्याचे ऐकिवात नसून, या मुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे फावले आहे.