*पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या अथक पाठपुराव्याला यश मिळाले.*
राज्यमंत्री व रायगडच्या पालक मंत्री माननीय नामदार कु.आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते उद्घघाटन करून आज पासून पनवेल येथील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर व रक्तपेढी सुरू करण्यात आली आहे.
तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी काही महिन्यापासून लागणारी उपकरणे देखील येथे बसवण्यात आलेली होती. परंतु तज्ञांची निवड करण्यात आली नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. रायगड जिल्ह्यातून येथे उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण येत असतात. किडनी आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चिक असल्याने जिल्ह्यातील रुग्ण दगावण्याची संख्यादेखील वाढत होती .आता ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला याचा नक्कीच फायदा होईल.