खारघर मध्ये मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न.

 खारघर मध्ये  मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न.

पनवेल/प्रतिनिधी

         कोकण शिक्षक मतदार संघाचे आम बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित जनसंपर्क कार्यालय  खारघर मध्ये दिनांक २८डिसेंबर २०२१रोजी  मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे  शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विधमाने बॉडी चेकअप, मोफत डोळ्यांची तपासणी शिबीर आयोजित केले होते.

     या वेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ दत्तात्रय पाटील,खारघर शहर अध्यक्ष राम कारावकर,खारघर चिटणीस अशोक मोरे,जिल्हा सहचिटणीस देवा मढवी, पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे, रवी पाटील,जयेश कांबळे,दिलीप ठाकूर,बलराम ठाकुर जगदीश घरत ,किर्ती मेहरा, संगीता गुलाटी, पिंकी शर्मा, सावंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात नागरिकांना  डोळे तपासून मोफत चष्मे वाटप करण्यात आले,तसेच नागरिकांचे बॉडी चेकअप मध्ये ब्लड शुगर ब्लडप्रेशर,ऑक्सिजन ची तपासणी करण्यात आली.