खारघर "नो लिकर झोन "शेकाप ने केले आम.बाळाराम पाटील.
खारघर ग्रामपंचायत मध्ये खारघर मध्ये" नो लिकर झोन"हे महत्वाचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले, या मुळे खारघर शहर हे सुक्षितांचे शहर म्हणून ओळखले जाते. जो पर्यंत खारघर ग्रामपंचायत मध्ये शेकापची सत्ता होती तो पर्यंत तो पर्यंत कोणताही कर लावला नाही,असे आम बाळाराम पाटील यांनी सांगितले ते आज ०५नोव्हेंबर २०२१रोजी खारघर मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले गेल्या १२वर्षात येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी जे नुकसान केले ते भरून काढण्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागले पाहिजे. या वेळी माजी माजी नगराध्यक्ष जे. एम.म्हात्रे,पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय पाटील,नगरसेवक गोपाळ भगत,शंकर म्हात्रे,गणेश कडू,राम करावकर,अशोक गिरीमकर,अजित अडसुळे संतोष गायकर,दिलीप ठाकूर, ज्ञानेश्वर पवार, संतोष सावंत,देवा मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जेष्ठ नेते नारायण घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले आता आपल्याला मरगळ झटकून फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घ्यायची आहे ,त्या साठी सर्वांनी एकत्र मिळून काम करू या .गणेश कडू यांनी सांगितले खारघरचे नंदनवन हे आम बाळाराम पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना केले आहे ,त्यांनी या साठी ५५कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मोरे यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पडले. या वेळी मोठ्या प्रमाणात खारघर मधील नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी अजित अडसुळे यांच्या" शेकापचा आवाज"या दिवाळी अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.