सन्मान प्रति आबासाहेबांचा ,सांगोल्याच्या राजकीय अस्मितेचा
बहुजनांचा शेतकरी कामगार वर्गाचा हक्काचा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची राज्यात ओळख आहे.या बहुजनांच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा ठेवा शेकापच्या पुरोगामी युवक संघटनांमार्फत जपला जात आहे.आजच्या विपरीत परिस्थितीतही शेकापचा युवा शिलेदार त्याच ताकदीने शेकापसोबत आहे हे विशेष.मागील ब-याच काळावधीपासून पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्षपद रिक्त होते.योग्य अशा चेह-यांची चाचपणी पक्षाच्या वरिष्ठांमार्फत चालूच होती.युवकांना नेतृत्व देणारे शेकापचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरोगामी युवक संघटनेचे कार्यक्षेत्र आहे.आज अलिबाग येथे राज्यस्तरीय शेकाप विस्तार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर मार्गदर्शन शिबिरात एकाच नावाचा सर्वानुमुखे उल्लेख करण्यात आला ते म्हणजे डॉ बाबासाहेब देशमुख.
सांगोला आणि शेकाप यांचा विशेष असा ऋणानुबंध राहीला आहे.मागील ५५ वर्षांचा काळखंड शेकापच्या राजकीय अस्मितेचा आणि विकासाचा केंद्रबिंदू राहीला तो दिवंगत गणपतराव देशमुख साहेबांमुळे.सांगोळ्याच्या गावागावांत आज बाबासाहेब देशमुखांचा एक वेगळाच जलवा बघायला मिळत आहे.तेच साधे राहणीमान,पायात साधी चप्पल,साधे वस्त्र,कुठलाही बडेजावपणा नसणारे आबासाहेब म्हणजे प्रतिआबासाहेबच.आज तोच विचारांचा वारसा घेऊन बाबासाहेबांची उणीव कुठेच जाणवू देत नाहीत.स्वभावामध्ये असणारी विनम्रता,गोरगरीब कार्यकर्त्यांना समजून घेण्याची वृत्ती,त्यांना आपुलकीने जवळ घेणे,त्यांची आदरपूर्वक विचारणा करणे यांमुळे अल्पावधीतच त्यांच्या लोकप्रियतेचा चढला आहे.आज त्यांच्या रूपाने खूप वर्षानंतर एक तेजस्वी नेतृत्व युवकांना लाभत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्रात स्वत:चे वेगळे अस्तित्व निश्चितच निर्माण करेल.या कार्यक्रमात सांगोल्याच्या युवकांचे आयडॉल भाई डॉ अनिकेत देशमुख यांची सुद्धा मध्यवर्ती कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.काय तो टाळ्यांचा प्रचंड कडकडाट,वाजणा-या शिट्या,तो प्रचंड उत्साह सांगोलकरांचा आपल्या नेत्याविषयी आणि शेकापविषयी.खरंच नेत्यावरचे निस्वार्थ प्रेम काय असते हे सांगोलकरांकडे बघितल्यानंतर समजते.बाबासाहेब तुमच्या उज्वळ राजकीय कारकीर्दीसाठी खटाराभरून लालरंगी शुभेच्छा. सर्व कार्यकर्ते नी मा. आमदार जयंत पाटील आणि वरिष्ठ नेते मंडळी चे आभार मानले.