#दिवाळीच्या_शुभ_मुहूर्तावर_प्रभाग_क्र_१०_मध्ये #विकासकामांचे_उदघाटन
पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात बेमुदत उपोषणास प्रभाग क्र.१० चे नगरसेवक रविंद्र अनंत भगत ४ दिवस बसले असता.उपोषणावेळी पनवेल महानगरपालिकेने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता पार पाडली. पनवेल महापालिका कळंबोली प्रभाग क्र.१० मध्ये नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या पुढाकाराने विविध विकासकामांचे मंगळवार (२ नोव्हेंबर) रोजी #आमदार_बाळाराम_पाटील_यांच्या_हस्ते #उद्घाटन_करण्यात_आले. या वेळी #प्रितम_दादा_म्हात्रे, #जिल्हा_चिटणीस_गणेश_कडू,
#काँग्रेस_अध्यक्ष_सुदाम_शेठ #पाटील_पनवेल_महानगरपालिका_नगरसेवक_गोपाळ_भगत, #नगरसेवक_विजय_खानावकर, #नगरसेवक_शंकर #म्हात्रे,#अनिल_नाईक_समाजवादी_पार्टी_जिल्हा #अध्यक्ष,गोमा कडव,जयराम कडव,माया भगत, कृष्णा भगत, अनिल भगत,आनंता भगत,हर्षवर्धन पोपेटा, सीताराम नाईक,मचिंद्र नाईक,विनोद पाटील,प्रदीप पाटील,गणेश भगत, किरण भगत,कमलाकर जळे,प्रल्हाद चौधरी,महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते तसेच कळंबोली गावातील उषा मोहिते,नीरा पोपेटा,भारती जळे, सरिता भगत, नीलम चौधरी समवेत गावातील व आदीवासीवाडी तील महिला उपस्थित होत्या. पनवेल महानगरपालिका कळंबोली गावातील विविध विकास कामांचे उदघाटन #आमदार_बाळाराम_पाटील_यांच्या_हस्ते करण्यात आले.स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव या नागरी कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला. दिवाळीतच या कामांचा शुभारंभ होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले असून नागरिकांनी नगरसेवक रविंद्र भगत यांचे आभार मानले आहेत.
कळंबोली प्रभाग क्र.१० मधील १)आदिवासी वाडी मधील गटारे, ड्रेनेज लाईन व रस्ते काँक्रीट तसेच २)कळंबोली गावातील स्मशानभूमी सुशोभीकरण,३)कळंबोली गावातील श्रीपाद भगत ते बैठक हॉल नवीन रस्ता,४)कळंबोली गाव स्मशानभूमी ते शर्मा बेकरी पर्यंत नवीन रस्ता,५)महेश मोहिते घर आणि चाळ ते महिला मंडळ कार्यालय पर्यंत नवीन रस्ता आणि ६)कळंबोली नारायण जाधव चाळ ते कातकर वाडी येथे नवीन गटाराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले, ‘नागरिक हा केंद्रबिंदू मानून विकासकामे झाली पाहिजेत. असे झाल्यास कळंबोली गावाचा आणि शहराचा खऱ्या अर्थाने विकास होईल. त्या शहरातील मैदाने, रस्ते, उद्याने ही सुनियोजित व शहराच्या सौंदर्यात भर पाडणारी असायला हवीत. यापुढेही आपले शहर हरित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर '#मेहनत_करे #मुर्गी_और_अंडा_खाये_फ़क़ीर' या प्रमाणे सत्ताधारी हे फक्त श्रेय घ्यायचं काम करत असल्याचं देखील आमदार बाळाराम पाटील यावेळी म्हणाले.